राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन लोगो
महा WCD GIS लोगो
महा WCD GIS - महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्रे आणि महिला व बाल संस्थांचे जीआयएस मॅपिंग

महाराष्ट्र अंगणवाडी व महिला-बाल विकास जीआयएस मॅपिंग प्रकल्प

महा WCD GIS हा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा प्रकल्प आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) आणि एकात्मिक बाल संरक्षण योजना (आयसीपीएस) अंतर्गत संस्थांची माहिती नकाशाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनने हा प्रकल्प विकसित केला आहे. अंगणवाडी केंद्रे आणि महिला व बाल विकास विभागाच्या विविध संस्थांची माहिती सोप्या विश्लेषणासाठी नकाशावर दाखवली आहे. माहिती पाहण्यासाठी खालील दोन दुव्यांचा वापर करा.

बाल संरक्षण संस्था - महिला व बाल विकास जीआयएस नकाशा

महिला व बाल विकास जीआयएस मॅपिंग

एकात्मिक बाल संरक्षण योजना (आयसीपीएस) ही केंद्र शासनाची योजना असून, अनाथ, अत्याचारग्रस्त किंवा शोषित अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना विविध संरक्षणात्मक सेवा देणे हा तिचा उद्देश आहे. या बालकांना निवारा, अन्न, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मिळावी याची खात्री ही योजना करते. बालगृहे ही आपल्या कुटुंबासोबत राहू न शकणाऱ्या बालकांची काळजी व संरक्षण करणाऱ्या निवासी संस्था आहेत. या संस्था सुरक्षित व पोषक वातावरण देतात, जिथे बालकांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर मूलभूत गरजा मिळतात. बालकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना यशस्वी भविष्यासाठी तयार करणे हे बालगृहांचे ध्येय आहे.

आमची भूमिका

जनजागृती व पाठपुरावा

बाळाच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व पटवून देणे

विचार गट

एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे आणि शासनाला धोरण निश्चितीसाठी वस्तुस्थितीवर आधारित सल्ला देणे

एककेंद्राभिमुखता

कुपोषण कमी करण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागांमध्ये एककेंद्राभिमुखता / एकवाक्यता आणणे

नवीन घडामोडी

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाला माविमच्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मसाठी “स्कोच सिल्व्हर पुरस्कार” मिळाला. शेत ते बाजारपेठ जोडणी मजबूत करून महिला शेतकऱ्यांना सक्षम करणारा हा डिजिटल उपक्रम आहे.

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाला “नो युवर डिस्ट्रिक्ट” या अंगणवाडी, बीट, प्रकल्प व जिल्हा स्तरावरील आयसीडीएस माहितीचे सुलभ दृश्यीकरण करणाऱ्या कमी खर्चाच्या डिजिटल उपक्रमासाठी, तसेच कोविड-१९ काळात समुपदेशन व माहिती-शिक्षण-संवाद (IEC) प्रसारासाठीच्या “तरंग सुपोषित महाराष्ट्राचा” या डिजिटल संवाद उपक्रमासाठी “ऑर्डर ऑफ मेरिट” मिळाले.

ट्विटरवर आम्हाला फॉलो करा

इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा